कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) यांनी दिली. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आणि पक्षातच राहणार आहोत असे अजित पवार म्हणाले. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत. मात्र मी त्याबाबत बोलणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
मला कामासाठी आमदार भेटले, वेगळा अर्थ काढू नका
काळजी करु नका पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यथकिंचीतही तथ्य नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. पक्षातच राहणार आहोत बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. मला कामासाठी आमदार भेटले. यामधून वेगळा अर्थ काढू नका असेही अजित पवार म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? असा सवालही आज अजित पवार यांनी उपस्थित केला. कोणत्याही पत्रावर 40 आमदारांच्या सह्या नसल्याचे अजित पवार म्हणाले.
प्रत्येकाने आपापले काम करावं, महाविकास आघाडी कशी वाढत जाईल
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल अजित पवारांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा असे अजित पवार म्हणाले.