• Sun. May 4th, 2025

महसूलमंत्री विखे पाटलांचा टॅक्सधारकांना मोठा दिलासा! राज्यातून NA टॅक्स पूर्णपणे हटवणार

Byjantaadmin

Apr 17, 2023

महसूलमंत्री विखे पाटील यांनी टॅक्सधारकांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच ‘एनए’ भरावा लागणार आहे. तर एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले विखे पाटील?

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, दरवर्षी एनए करणे ही क्लिष्ट असते, लोकांना याचा मोठा त्रास होता. त्यामुळे आता खरेदीच्या वेळीसच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार असल्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्यामुळे एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नाही.

या नवीन निर्णयामुळे सरकारचा काही महसूल बुडेल, परंतु प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल. तसेच यासह भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांत घरपोच देण्यात येईल, असेही VIKHE PATIL म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *