भाजपच्या माजी आमदार आणि कुरनूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा काल रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.नीरजा रविवारी हैदराबादहून कर्नूलला येत असताना तेलंगणातील बीचुपल्ली येथे त्यांच्या कारचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 44 वर जोगुलांबा गढवाला जिल्ह्यातील इटिक्याला मंडळाच्या जिंकलापल्ली मंडळाजवळ झाला. या अपघातात अलुरू येथील नीरजा रेड्डी यांचा मृत्यू झाला. नीरजा रेड्डी हैदराबादहून कर्नूलला जात असताना टायर फुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली. या वेळी फॉर्च्युनर कार पलटी होऊन भीषण अपघात झाला
या अपघातात नीरजा रेड्डी यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.