मागील ७० वर्षांत काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी राज्याचा कारभार पाहिला, मात्र या काळात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेला काय मिळाले? आजही या घटकांची अवस्था बिकटच आहे. मात्र (Bharat Rashtra Samiti) बीआरएस पक्ष त्यांच्या जीवनात खरी समृद्धी आणण्याचे काम करणार आहे. तेलंगाणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांनी ते करून दाखविले आहे. आता महाराष्ट्रातही ते शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणू पाहत आहेत, असा दावा बीआरएसच्या वतीने करण्यात येत आहे
येत्या २४ एप्रिल रोजी तेलंगणाचे CM KCR यांची शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेची माहिती बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांनी दिली.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र आपला पक्ष वाढविण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या दोन सभांनंतर केसीआर यांनी मराठवाड्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. harshwardhan jadhav या सभेसाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी बीआरएसचे खासदार बी.बी पाटील,आमदार जीवन रेड्डी, शकील आमिर, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम आज शहरात दाखल झाले होते.