मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे पुलवामा सारखा मोठा हल्ला घडून आला, असे गंभीर आरोप जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला आहे. पंतप्रधानांना सांगितले की, पुलवामा हल्ला आपल्याच चुकीमुळे घडून आला आहे. पण तेव्हा मला गप्प बसवले गेले, असा ही दावा मलिक यांनी केला आहे. आता मलिक यांच्या याच दाव्यावरून, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री CHAGAN BHUJBAL यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत जो गौप्यस्फोट केला आहे, याची शहानिशा करणे अत्यावश्यक आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. मलिक हे भाजपमध्येच होते. त्यामुळे त्यांना यासंदर्भात अधिकची माहिती असेल. त्यांनी जी माहिती दिली आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. याबाबतीत जी कोणती तपास यंत्रणा काम करत असेल, त्या यंत्रणांनी हा तपास केला पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणालेत.
यासोबतच भुजबळ म्हणाले, मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी पालिका आहे. मुंबई हे देशाचे नाक आहे. यामुळे स्वाभाविकच प्रत्येकाला वाटत असेल की, या पालिकेवर आपली सत्ता राहावी. मुंबईचा महापौर आपल्या पक्षाचा असायला हवा. यासाठीच सगळे प्रयत्नशील असतात, अशे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्य़ावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले होते सत्यपाल मलिक ?
सत्यपाल मलिक यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सीआरपीएफचा ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान दिले असते तर हा हल्ला झालाच नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच आपण पंतप्रधान मोदींना आपल्यामुळे जवानांचे प्राण गमावले, असे म्हटलं. पण यावर पंतप्रधानांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला, असही मलिक यांनी यावेळी सांगितल.