दारू घोटाळा प्रकरणावरून राजधानी दिल्लीत राजकारण तापलं आहे. असे असतानाच केंद्रीय तपास यंत्रणेने आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री ARVIND KEJRIWAL यांनाही समन्स पाठवले आहे. या प्रकरणी आज (१५ एप्रिल) मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक हजार कोटी रुपये दिले होते. आता करा मला अटक, मग हे लोक लोक स्वीकारतील का? असा सवाही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
ईडी आणि सीबीआयने न्यायालयात खोटी विधाने केली आहेत. दारू घोटाळा प्रकरण काही नाही. एक रुपयाच्या घोटाळ्याचा पुरावाही त्यांच्याकडे नाही, असा दावाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, दोन्ही केंद्रीय एजन्सींनी लोकांना मारहाण करुन आणि धमकावून अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या विरोधात बोलण्यास सांगितल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. याच वेळी त्यांनी 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपणएक हजार कोटी रुपये दिले होते. नुसते आरोप करून कारवाई करता येत असेल तर अटक करा. पण पुरावे तर पाहिजेत ना. की अशीच कारवाई करणार, असही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
देशातील सर्व बड्या एजन्सी आपला काम-धंदा सोडून दारू घोटाळ्याच्या तपासात गुंतल्या आहेत. ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये 14 फोन नष्ट केल्याचे सांगितले.पण आता ईडीने आपल्या जप्ती मेमोमध्ये फक्त 5 फोन त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच, बाकीचे फोन अजूनही चालू आहेत आणि कुठेना कुठे ते वापरले जात आहेत. खोट्यावर खोटे बोलले जात आहे. कोर्टात खोटे बोलून मनीष सिसोदिया यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांवर अत्याचार होत आहेत. खोटे विधान केल्याने त्यांना मारहाण केली जात आहे. एक म्हणजे चंदन रेड्डी, त्याला एवढी मारहाण झाली की त्याच्या कानाचा पडदाही फाटला. त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला, असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
याच वेळी त्यांनी धक्कादायक आरोपही केला आहे. काही लोकांच्या पत्नी आणि वडिलांना एका खोलीत बसवले गेले आणि खोटे बोलण्यासाठी बोला अन्यथा कुटुंबियांचेही नुकसान करु असे धमकावले गेले. एकाच्या मुलीला धमकावण्यात आले. जर तुम्ही 100 कोटींबद्दव बोलत आहात तर तो पैसा गेला कुठे. सगळीकडे छापेमारी करा, मनीष सिसोदिया यांच्या घरावर ठिकठिकाणी छापे मारण्यात आले मात्र काहीही मिळाले नाही. मग गोव्याच्या निवडणुकीत खर्च केल्याचे सांगितले. तिथेही छापा टाकला. पण काहीही सापडले नाही. सर्व देयके चेकद्वारे करण्यात आली. निवडणूक आयोगाकडेही सर्व माहिती आहे. मी पुन्हा म्हणेन की केजरीवाल भ्रष्ट असतील तर या देशात प्रामाणिक कोणी उरले नाही. सीबीआयने उद्या मला चौकशीसाठी बोलावले आहे. मी नक्की जाईन भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर ते मला नक्कीच अटक करतील, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे.