• Sun. May 4th, 2025

आता आम्हाला कुणी भाजपची बी टीम म्हणू नये..

Byjantaadmin

Apr 15, 2023

राष्ट्रवादी काॅंग्रेस कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या संदर्भात घोषणा केली होती. पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर निवडणूक आयोगाने खास कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादीला घड्याळ या चिन्हावर लढण्याची परवानगी दिली आहे. एकीकडे देशात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी बनवण्याचे सगळ्या विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.

स्वतः शरद पवार त्यासाठी पुढाकार घेत आहेत. असे असतांना महाविकास आघाडीती NCP घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेसला नुकसान करून भाजपला फायदा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात निवडणुक लढवत आहेत का? असा सवाल उपस्थितीत केला जात  MIM MP IMTIYAZ JALIL नेमंक याच मुद्यावरून राष्ट्रवादी व एमआयएमला कायम भाजपची बी टीम म्हणणाऱ्या पक्षांना टोला लगावला आहे.

आता आम्हाला भाजपची बी टीम म्हणून नका? असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे. एमआयएमने जेव्हा जेव्हा राज्यात व राज्याबाहेर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून विरोधकांकडून हल्ला केला गेला. आता राष्ट्रवादीने स्वबळावरKARNATAKA तब्बल ४६ विधानसभा मतदारसंघात लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका सहाजिकच काॅंग्रेसला बसणार असून भाजपला याचा राजकीय लाभ होणार आहे.

राष्ट्रवादीने भाजपला लाभ मिळवून देण्यासाठी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे का? असा सवाल देखील एमआयएमकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कर्नाटकमध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार आहे. आधी या पक्षाला फ्रीज हे चिन्ह देण्यात आले होते. परंतु आता निवडणुक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला त्यांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. कर्नाटकमध्ये शरद पवार पाच ते सहा सभा घेणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *