राज्याच्या राजकारणासह देशात सावरकरांवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी सुरु केलेला वाद अद्यापही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मी माफी मागायला सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कधी माफी मागत नाहीत, असे विधान राहुल गांधींनी केले होते. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. तसेच सावरकारांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यभर सावरकर गौरव यात्रा सुरू केली. आता या यात्रेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात SHIVANI यांनी मोर्चा उघडला. शिवानी म्हणाल्या, “फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत. कुठला मोर्चा काढतात..? तर सावरकर मोर्चा काढतात आणि सावरकर मोर्चा काढून काय करतात? सावरकरांचे विचार काय होते, तर बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. बलात्काराचे हे हत्यार विरोधकांच्या विरोधात वापरले पाहिजे. त्यामुळे अशा यात्रांमुळे माझ्यासारख्या महिला भगिनीला सुरक्षीत कसे वाटेल? अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात.”
शिवानी यांच्या या वक्तव्याने राज्यात आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचा सावरकरांचे नातू SATYKI SAWARKAR यांनी समाचार घेतला आहे. तसेच सावरकरांनी तसे कुठे लिहीले असेल ते दाखविण्याचे आव्हानही त्यांनी वडेट्टीवारांना केले आहे.
सात्यकी म्हणाले, “शिवानी वडेट्टीवार यांनी अत्यंत चुकीचे विधान केलेले आहे. मात्र सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरे पाने’ या पुस्तकात असे कुठलेही वाक्य लिहिलेले नाही. त्यांनी ते वाक्य काढून दाखवावे. ते पुस्तक मी वाचलेले आहे. त्यांना सल्लागार सांगतात तेच बोलताता. त्यांनीही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे.”
सावरकरांवर टीका केवळ राजकीय हेतून केली जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सात्यकी सावरकर म्हणाले, “सध्या सावरकरांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. सध्या देशात, राज्यात हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. ते सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाते. दरम्यान, विरोधकांच्या हातातून सत्ता गेलेली आहे. आती ती सत्ता पुन्हा मिळवायची या राजकीय लाभापोटीच सावरकरांना लक्ष्य केले जात आहे.”