फुले -आंबेडकर जयंती निमित्त जाहीर व्याख्यान
महावितरण विभाग निलंगा येथे दि 14 एप्रिल 23 रोजी सकाळी 10 वा फुले -आंबेडकर जयंती निमित्त जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के पोवार कार्यकारी अभियंता विभाग निलंगा हे राहणार आहेत. सुधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांचे व्याख्यान होणार आहे, तर या कार्यक्रमासाठी निलंगा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत असे जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष सत्यप्रकाश कांबळे,जी व्ही नरदेव, श्रीमती सी एस गायकवाड, सतिष डी सुर्यवंशी, नितीन कांबळे, अनिल कांबळे,एस के पुरी,पी एस सुर्यवंशी,रवी घोडके,यांनी कळवले आहे.