• Thu. May 1st, 2025

जागृती शुगर कडून २०० रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Byjantaadmin

Apr 10, 2023

जागृती शुगर कडून २०० रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

चालु हंगामात १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना अदा

११ हंगामात १ हजार २१६ कोटी,६१ लाख ७७ हजार रुपये शेतकऱ्यांना उसबिला पोटी वाटप

लातूर दि. १०.

जागृती शेतकऱ्यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे मराठवाडा व विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने चालु गाळप हंगामात ६ लाख ३२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून आजतागायत चालु हंगामात १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये शेतकऱ्यांना अदा केली आहेत मांजरा साखर परिवाराच्या धोरणानुसार चालु हंगामात २२००/ रूपये मेट्रिक टन प्रमाणे पहिल्या हप्तापोटी १३९ कोटी ४ लाख २२० रूपये तर दुसरा हप्ता २०० रुपये प्रमाणे १२ कोटी ६४ लाख असे एकूण १५१ कोटी ६८ लाख २४० रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत यामुळे देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकुर, उदगीर, लातूर,औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

*जागृती शुगर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा*

*अध्यक्षा सौ गौरवी भोसले देशमुख यांची माहिती*

एकेकाळी उजाड माळरान असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या तळेगाव येथील जागृती शुगर ने पहिल्या गळीत हंगामापासून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक भाव देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे या भागातील शेतकर्यांचा आर्थिक विकास बघायला मिळत आहे शेती सुधारली उसाचे क्षेत्र वाढले माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ११ वर्षात कारखान्याने अतिशय काटेकोर पणे नियोजन करून उस उत्पादक शेतकऱ्यांना झुकते माप देण्याचे काम जागृती शुगर च्या संचालक मंडळाने केले असून यापुढेही करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी माहिती जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले देशमुख यावेळी बोलताना सांगितले

*आकरा गाळप हंगामात १ हजार २१६ कोटी ६१ लाख ७७ हजार ४८७ रूपये शेतकऱ्यांना देणारा जागृती शुगर*

*माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती*

जागृती शुगर ने पहिल्या गाळप हंगामात जो शब्द आम्हीं दिला होता उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यात सर्वाधिक भाव असेल, को जनरेशन सुरू, इथेनॉल निर्मिती सुरू केली हे करीत असताना जागृती शुगर ने उस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू समोर ठेवून अचूक कामगिरी करत पारदर्शकता ठेवून उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत अशी माहिती जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी बोलताना दिली.

*उस उत्पादक शेतकऱ्यांनी खात्यावरील जमा रक्कम घ्यावी*

जागृती शुगर कारखान्याकडून चालु गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची रक्कम २००/ रूपये उसाच्या प्रति मेट्रिक टन पोटी एकूण १२ कोटी ६४ लाख रुपये खात्यावर वर्ग केले आहेत चालु गळीत हंगामात उस देणाऱ्या सभासदांनी खात्यावरील रक्कम घ्यावी असे आवाहन जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे सरव्यवस्थापक गणेश येवले सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *