मांजरा सहकारी साखर कारखान्यामार्फत दोनशे रुपयांचा अग्रीम हप्ता उस उत्पादकांच्या खात्यावर जमा
हनुमान जन्मोत्सव दिनी उस उत्पादक शेतकऱ्यांना दिली गोड बातमी
लातूर :-राज्यात सहकारातील साखर इंडस्ट्रीजमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या विलास नगर लातूर येथील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून चालु गळीतासाठी आलेल्या ऊसाच्या बिलापोटी प्रती टन २००/ रूपये अग्रीम हप्ता आज गुरुवारी हनुमान जन्मोत्सव दिनी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली असून उस उत्पादक शेतकऱ्यांना ही हनुमान जन्मोत्सव ची गोड बातमी दिली आहे
याबाबत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा साखर कारखान्याचे कारखान्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आमदार धीरज विलासराव देशमुखसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधून हंगाम 22-23 मध्ये गळीतासाठी आलेल्या उसाचे बिलापोटी प्रतिटन रु. २०० प्रमाणे ऊस बिलाचा अग्रीम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार उस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले असून सदरची रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेतून घेऊन जावेत
असे आवाहन मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व सन्माननीय संचालक मंडळ यांनी यांनी केले आहे.