बाभळगाव येथे ग्रामपंचायतिच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
लातूर :-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान महिन्यात लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील मशिद मध्ये बाभळगाव ग्रामपंचायती चे उपसरपंच गोविंद देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजीत केलेल्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी साजरी करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी सायंकाळीं नमाज पठण झाल्यावर रोजा सोडला इफ्तार पार्टीत सहभागी होऊन मोठा प्रतिसाद मुस्लिम बांधवांनी दिला
बाभळगाव हे राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे गाव सर्वधर्म समभाव असलेले पंचक्रोशीतील गाव आहे गुरुवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी गावातील मंदिर, मस्जिद,दर्ग्याला भेट दिली होती या गावाचे वेगळेपण देशमुख कुटुंबांनी जपलेले आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत इफ्तार पार्टी साठी पुढाकार घेत असते
यावेळी इफ्तार पार्टीस बाभळगाव चे उपसरपंच गोविंद देशमुख, इमाम मुजेवार, लतिफ शेख, नुर शेख, पैगंबर शेख, जहागीर शेख, दाऊद शेख, आयुब शेख, संभाजी जाधव, मुस्तफा शेख, नबी पठाण यांच्यासह गावातील मुस्लिम बांधव उपस्थित होते