दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या डिग्रीची मागणी केली आहे. त्यावरुन केजरीवाल यांनी न्यायालयाने २५ हजारांचा दंडही ठोठावला. त्यानंतर आता दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिश सिसोदिया यांनी तुरुंगात देशाच्या नावे एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनीही पंतप्रधानांचे कमी शिक्षित असणे देशासाठी धोकादायक असल्याचे लिहिले आहे. पंतप्रधानांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. गेल्या काही वर्षांत दिल्लीतील साठ हजार शाळा बंद पडल्या असल्याचे सांगच देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांनी शिक्षित असणे गरजेचे आहे. असेही म्हटले आहे.
आज आपण २१व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानात दररोज नवनवीन प्रगती होत आहे. संपूर्ण जग कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलत आहे. अशा परिस्थितीत घाणेरड्या नाल्यात पाईप टाकून घाणेरड्या गॅसपासून चहा किंवा जेवण बनवता येते असे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून माझे हृदय धडपडते.नाल्यातील घाणेरड्या गॅसपासून चहा किंवा अन्न बनवला जाऊ शकतो का? नाही.