• Wed. Apr 30th, 2025

राज्य सरकारकडून का बंद करण्यात आलं डीएड? मग आता शिक्षक व्हायचं तरी कसं?

Byjantaadmin

Apr 5, 2023

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारनं डिप्लोमा इन एज्युएकेशन म्हणजेच डीएड हा कोर्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतर भागांतही डीएड बंद करण्यात आलं आहे. . राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. यामुळे हा बदल आवश्यक मानला जात आहे. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीचे असतील. पण नक्की डीएड बंद का झालं? आणि आता शिक्षक होण्यासाठी करावं काय लागणार? कसं घ्यावं लागेल शिक्षण? आज आम्ही तुम्हाला याचा संपूर्ण रोडमॅप सांगणार आहोत.

Bएड पदवी अभ्यासक्रम पदवीनंतर दोन वर्षांत पूर्ण करता येतो. बारावीनंतर बीएड करायला आतापासून चार वर्षे लागतील. दहावीनंतर डी.एड करून शिक्षक होण्याचा शॉर्टकट आता संपणार आहे.मात्र यामुळे आता सहज उपलब्ध होणारे डी.एड शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, काही वर्षे समस्या असतील. शिक्षक होण्याचा कमी खर्चिक मार्ग बंद होईल. डी.एड बहुतेक महिला होत्या, त्यांच्या करिअरवर परिणाम होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed