जबरी चोरीतील आरोपीला अटक, ₹ 65,000/- चा मुद्देमाल जप्त, पोलीस ठाणे निलंगा यांची कामगिरी
निलंगा:-याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दि.31/03/2023 रोजी निलंगा शहरातील नितनवरे यांचे घरासमोरून एक अंदाजे 30 ते 35 वयोगटातील अनोळखी आरोपीने त्याचे ताब्यातील काळ्या रंगाच्या मोटर सायकलवर फिर्यादी महिले जवळ येवून निलंगा ते नणंद रोड लगत नमूद फिर्यादी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी देवुन निघून गेला.
त्यावरून पोलीस ठाणे निलंगा येथे गुरन.101/2023 कलम 392,506 भा.द.वी. प्रमाणे (जबरी चोरी) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, व उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे निलंगा पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण शेजाळ, यांचे नेतृत्वात पोलीस तपास पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्यांनी सांगितलेल्या वर्णना वरून व नगरपरिषद निलंगा यांच्या मार्फत निलंगा शहरात विविध ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणी करून मिळून आलेल्या माहिती वरून दि.01/04/2023 रोजी गुप्त बातमीदार मार्फत विश्वसनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून गुन्ह्यातील अनोळखी आरोपीस निष्पन्न केले. त्याचे नाव पुढील प्रमाणे
1)निखिल प्रताप पाटील वय 33 वर्ष रा. रामेगाव ता. औसा जी. लातूर.
नमूद आरोपीस मौजे रामेगाव ता.औसा येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाणे निलंगा येथे आणून विचारपूस केली असता त्याने सदरच्या गुन्हा केल्याचे कबूल करून नमूद आरोपी निखिल पाटील उर्फ बुंदगे याने गुन्ह्यात जबरी चोरी केलेले फिर्यादी महिलेच्या अंगावरील सोन्याचे 24 मणी, 4 सोन्याचे पान, 2 कानातील 2 सोन्याचे फुले व नाकातील सोन्याचा खडक असे जुने वापरते अंदाजे 7 ग्रॅम 410 मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ₹30,000/-, रोख रक्कम ₹ 5000/-, रुपये व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन कंपनीचे काळया रंगाची जुनी वापरती मोटर सायकल किंमत अंदाजे 30,000/- रुपये असा एकूण 65000/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक श्री. शेजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गोविंद राठोड हे करीत आहेत.
सदर कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे निलंगा येथील पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण शेजाळ यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्री. गोविंद राठोड, पोलीस अमलदार, सुधीर शिंदे, संदीप कांबळे, नितीन मस्के यांनी केली आहे.