मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसांच्या पत्नी संगीता डवरे यांचे आज निधन झालं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना झालेल्या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी तक्रार संगीता यांनी केली होती. त्यावर कारवाई होत नसल्याने संगीता यांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सरकार दरबारी खेटे घालूनही हाती निराशाच आल्यामुळे संगीता डवरे यांनी 27 मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी दोन अन्य वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
काय आहे प्रकरण?
डवरे यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. या डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन डवरे या मंत्रालयात पोहचल्या होत्या. या गोष्टी संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने त्यांनी मंत्रालयात च २७ मार्च रोजी विष प्राशन केले होते
संगीता यांच्याव्यतिरिक्त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांमध्ये बीड येथील शीतल गादेकर आणि पुण्याचे दिव्यांग रमेश मोहिते यांचा समावेश होता. यातील शीतल यांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता तर संगीता आणि रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू होते.