ठाणे : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यालाला मारहाण केल्याची घटना समोर आली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणामुळे आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे. कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध आक्रमक असलेले पाहायला मिळत आहे. त्यातूनच ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्यालाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आज दुपारी रोशनी शिंदेंची दुपारी भेट घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी, संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हीही बेदम मारहाण करू शकतो, असा इशारा देताना ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा, देवेंद्र फडणवीस तुम्ही फक्त ठाण्याचे गृहमंत्री आहात का? असा सवाल राऊतांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ठाण्यात हे सगळं होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
शिंदे गटाने फेटाळले आरोप
दरम्यान, शिवसेनेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले आहे. काल जो प्रकार झाला त्या प्रकरणाचा बाऊ केला जात आहे. त्या महिलेला मारहाण झालेली नाही. सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट आला आहे. त्यात त्या महिलेला मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याकरता खासदार महिलेला पुढे करुन राजकारण करत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण झाली नाही हे स्पष्ट दिसतं आहे, असा दावा मिनाक्षी शिंदेंनी केला आहे.
जाणीवपुर्वक एक टीम तयार करुन बदनामी केली जात आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर जाणीवपुर्वक टीका केल्या जात आहे. मुख्यमंत्र्यांना डी-लीट पदवी मिळाली त्यावर देखील मुद्दाम टीका केल्या गेल्या आहे. ती स्वतः चालत पोलीस स्टेशनला गेली होती. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर एकाला अटॅक येवून मृत्यू झाला होता. तिथे उद्धव ठाकरे पोहोचले नाहीत पण आता इथे काहीच झाले नाही तरीही ते भेटायला येत आहे, अशी टीकाही मिनाक्षी शिंदेंनी केला.
डॉक्टरांचं काय म्हणणं आहे?
दरम्यान, नातेवाईकांनी काल तिला रूग्णालयात दाखल केले. मोठी जखम आढळली नाही. मुका मार लागला आहे. पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोनोग्राफी केली तर अंतर्गत रक्तस्त्राव झालेला नाही. तिच्या जीवाला धोका नाही. काळजीस्तव आयसीयूमध्ये ठेवले आहे. युरिनल प्रेंग्नसी टेस्ट केली, ती निगेटीव्ह आली आहे, अशी माहिती संपदा रूग्णालय डॅा उमेश आलेगांवकर यांनी दिली.