• Tue. Apr 29th, 2025

समृद्धी महामार्ग चे जेएमडी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा सत्कार

Byjantaadmin

Apr 3, 2023
समृद्धी महामार्ग चे जेएमडी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा सत्कार
लातूर ( विशेष प्रतिनिधी)हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चे जेएमडी तथा मा.सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई चे उत्कृष्ट अभियंता आणि महाराष्ट्र सरकार मधील अधिकारी अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना नुकताच गोवा चा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल निलंगा च्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
जे जे नवे ते लातूर ला हवे या उक्ति प्रमाणे अनिलकुमार गायकवाड यांनी आपल्या लातूर जिल्ह्याला तीन महामार्ग जोडण्याचे मोठे काम केले आहे. सध्याचा नागपूर रत्नागिरी महामार्ग, आता नवीन नागपूर गोवा शक्ती पीठ महामार्ग,आणि विशेष म्हणजे एक मुंबई ते आंध्र जाणारा सर्वात शॉर्ट कट महामार्ग सुरु होणार आहे मुंबई लातूर चे अंतर केवळ चार तासात पुर्ण होणार आहे. असे महामार्ग चे जंग्शन भविष्यात लातूर ला निर्माण करणारे अनिलकुमार गायकवाड यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी सर्वाणी शुभेच्छा दिल्या. माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड,निलंगा विधान सभेचे अभय साळुंके,निलंगा चे प्रा.दयानंद चोपणे,माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष  मिथुन दिवे,गोविंद सूर्यवंशी, रामलिंग रामलिंग पटसाळगे,अमर वाघमारे,अभिजीत गायकवाड, एकमत चे लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed