छत्रपती संभाजीमहाराज नगर येथे काल (रविवारी) महाविकास आघाडीच्या झालेल्या वज्रमूठ सभेत नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.या सभेत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणं आघाडीच्या नेत्यांनी टाळलं. यावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकाराची सूचना स्वीकारली.
“तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी वज्रमूठ सभेत मोदी, शाह यांचे नाव घेतलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन काहीही बोलला नाहीत.त्यांच्याविषयी सॉफ्टकॉर्नर आहे का? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला.
यावर ते म्हणाले, “पुढची सभा ही fadnvis बालेकिल्ल्यात (नागपूर) आहे. मला जर बोलायची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार. तुमची सूचना अजित पवारने स्वीकारली,” पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या सुरु असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi)च्या पदवीवरुन रंगलेल्या राजकारणावर अजित पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
पवार म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी निवडून दिलं होतं का? त्यांनी २०१४ मध्ये स्वत:चा करिष्मा निर्माण केला होता. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो,
या सभेत आघाडीच्या अन्य नेत्यांच्या खूर्चीपेक्षा ठाकरे यांनी खूर्ची वेगळी होती. यावरुन ठाकरे हे आता आघाडीची प्रमुख नेते झाले आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या प्रश्नाला राज्याचे विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्यासाठी विशेष खूर्ची व्यासपीठावर होती. यात अन्य कुठलाही उद्देश नव्हता,” उद्धव ठाकरे यांची व्यासपीठावर शेवटी एन्ट्री झाली, तेव्हा फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. एकूणच कालच्या सभेने उद्धव ठाकरेंनाच आघाडीचा प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट केलं का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे, यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्यासाठी विशेष खूर्ची व्यासपीठावर होती. यात अन्य कुठलाही उद्देश नव्हता,” असे अजित पवार म्हणाले.