• Tue. Apr 29th, 2025

राहुल गांधींना जामीन मंजूर, सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय

Byjantaadmin

Apr 3, 2023

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची सुनावली होती. तर आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुरत कोर्टाने दिली होती ३० दिवसांची मुदत

सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणं आवश्यक होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. आता याबाबत नेमकं काय होईल ते १३ एप्रिलला समजू शकणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई होती त्यावर विचार होईल

१३ एप्रिलला दोन्ही बाजूंकडचे युक्तीवाद होतील. त्यानंतर या संदर्भातला फैसला येणार आहे. १३ एप्रिल ही पुढची तारीख आता न्यायालयाने दिली आहे. आज rahul gandhi बहीण प्रियंकासह सुरतमध्ये पोहचले. त्यांच्यासोबत मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातले नेते होते. कोर्टात राहुल गांधींनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक याचिका जामीन मिळण्याबाबत होती तर दुसरी याचिका शिक्षेला आव्हान देणारी होती. राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची खासदारकी त्यांना परत मिळणार का या प्रश्नाचं उत्तर आज तरी अनुत्तरीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed