• Tue. Apr 29th, 2025

जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक परिवर्तन-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Sep 22, 2022

जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक परिवर्तन

चालु वर्षी बँकेचा निव्वळ नफा ११ कोटी रुपये

लातूर जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर दि.२२:-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाच्या सावलीखाली लाखो कुटूंब आहेत. त्यामुळे जिल्हा बँक ही सावकारी नसून ती सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले पाहिजे असे कार्य गेली २५ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या योजनेतून झाले आहे यापुढेही अधिक वेगाने चांगले कार्य सर्वांना सोबत घेऊन करायचं आहे असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. ते गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा बँकेच्या ३९ व्या सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे , उपाध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, भगवानराव पाटील तळेगावकर, व्यंकटराव बिरादार, अनुप शेळके, अशोकराव पाटील निलंगेकर, मारोती पांडे, एन. आर. पाटील, राजकुमार पाटील, संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, संचालिका सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, स्विकृत संचालक सुनिल कोचेटा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

*३५ वर्षात बँकेच्या माध्यमातून चांगल कार्य करू शकलो*

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हनाले की जिल्हा बँक ही कल्पवृक्ष आहे तुम्ही स्वप्न बघा स्वप्न पुर्ण करण्याची जवाबदारी आमची आहे असे सांगून ३५ वर्षात मी एक वेळा चेअरमन होतो त्यानंतर माझे सर्व सहकारी चेअरमन झाले पण पालक म्हणून मी कर्तव्य पार पाडले सर्वांनी साथ दिल्याने चांगल काम करू शकलो भविष्यात अधिक वेगाने काम करायचं आहे नूतन चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या संकलपनेतून विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून मोबाईल एसएमएस द्वारें कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असे अनेक चांगले निर्णय घेत आहेत त्यांचे कौतुक केले

*बँक कर्मचारी व गटसचिव यांना दिवाळीचा बोनस म्हणू २२ % व एक महिन्याचा पगार जाहिर*

*बिनव्याजी १७०o कोटी रुपये पिक कर्ज वाटप करणारी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विभागातील लातूर बँक पहिल्या स्थानावर*

चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती

यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष तथा सर्वसाधारण सभेचे आमदार धीरज देशमुख म्हणाले की माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने शेतकरयांना न्याय देण्याचे काम केले असून पहिल्यांदा बँक हातात घेतली तेव्हा ११ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. आज दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३५०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत हा आपल्या नेतृत्वाने कामातून निर्माण केलेला विश्वास आहे दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृ्त्वाखाली आम्ही काम करतोय म्हणूनच बँकेने गरुड झेप घेतली असून जुन्या संचालक मंडळाने चांगले कार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करून यापेक्षा अधिक कार्य करण्या चा आमचा प्रयत्न राहील असे सांगून बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा ९७% (रिकवरी) वसूली झालेली आहे त्याबद्दल बँकेचे अधिकारी कर्मचारी गट्सचिव यांचे कौतुक केले

*जिल्हा बँकेने उस तोडणीसाठी ११० कोटी रुपये वाटप केले*

जिल्ह्यातील साखर कारखान्यास उस तोडणी मजूर अभावी अडचण लक्षात घेवुन साखर कारखान्याने शिफारसी केल्या आम्ही बँकेने शेतकऱ्यांना ८५ हर्वे स्टर मंजुर केले त्यातून किमान २ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे असे सांगून बँकेने जिल्ह्यातील सहकार चळवळ उभी केली त्यात साखर कारखाने ऊभे राहिले त्यामुळें जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मोठ्या फायदा झाला त्यामुळें लातूरची आर्थिक घडी बसवण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे

*डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न*

येणाऱ्या काळात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून मोबाईल फोन वर कर्जाची माहिती कर्ज सुविधा आदि सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्यानी यावेळी बोलताना सांगितले

*जिल्हा बँकेच्या वतीने २ मोबाईल फिरते वाहन सेवेचा शुभारंभ*

जिल्हा बँकेच्या वतीने नूतन २ मोबाईल फिरते वाहन नाबार्ड बँकेच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे त्याचा शुभारंभ माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब व बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्तित्तीत करण्यात आला

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर अशोक गोविंद पूरकर यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सभेचे वाचन बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले सर्व विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी मांडले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन, शेतकरी सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते बँकेचे अधिकारी कर्मचारी, गटसचिव, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed