भारतीय राष्ट्रीय काँंग्रेस,राष्ट्रवादी काँंग्रेस,शिवसेना,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने शिंदे-फडणवीस शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात धडक र्मोचा व रास्ता रोको आंदोलन
शिरुर अनंतपाळ :-तालुक्यातील शंखी गोगलगाय प्रार्दुभाव,अतिवृष्टी व संततधार पावसामुळे दुबार व काही शेतकरी यांनी तिबार पेरणी करुणही प्रचंड पिकाचे आतोनात नुकसान होऊनही अनुदानातून वगळल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी असल्यामुळे शिरुर अनंतपाळ येथील बस्वेश्वर चौकात सरसकट हेक्टरी 50000 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात धडक र्मोचा व रास्ता रोको आंदोलन करण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर , युवक राष्ट्रवादी प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस सचिव अभय साळुंखे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस प्रा. महेताब शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष माणिकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करुन नायब तहसिलदार तानाजी यादव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाअध्यक्ष काँग्रेस कमिटी आबासाहेब पाटील ऊजेडकर, तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टी विठ्ठलराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख. भागवतराव वंगे, शिवसेना शहरप्रमुख सतिश शिवणे, शिवराजआण्णा धुमाळे,नगरसेवक. सुधीर लखनगावे,संतोष शिवणे,अँंड.सुतेज माने,संजय बिराजदार, लक्ष्मणराव बोधले,राजकुमार पाटील, वैशंपायन जागले, द्यानेश्वर पाटील, अब्दुल अजीज मुल्ला, राजेंद्र साकोळे, लासुणे सुचीत, तानाजी निडवंचे,डाँं.संजय बंडले,संतोष महाजन,गुराळे गणेश, निवृत्ती सुर्यवंशी,रुत्वीक सांगवे, शैलेश वलांडे, मुसाभाई मुजेवार,प्रतिक पारशेट्टे, शिवदास ऊंबरगे,अकबर तांबोळी,ईस्माईल पठाण,रमेश सोनवणे,योगेश बसपुरे,रहिम पटेल, खांडेकर अविनाश,पंढरी माने,आदीसह तालुक्यातील जवळपास सहाशे ते सातशे शेतकरी,कार्येकर्ते,पदाधिकारी, सरपंच,चेअरमन, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.