• Tue. Apr 29th, 2025

ते संविधान उध्वस्त करत असताना आपण आपसात भांडणे बरे नव्हेःऍड.सुषमा  अंधारे

Byjantaadmin

Mar 27, 2023
ते संविधान उध्वस्त करत असताना आपण आपसात भांडणे बरे नव्हेःऍड.सुषमा  अंधारे
लातूर,दि.२७ः सध्या देशात स्वायत्त संस्थांच्या कामात केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे,जो संविधानाला मारक आहे,असे स्पष्ट करु,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरंानी मोठ्या कष्टाने आपणाला बहाल केलेले संविधान भाजपाचे मोदी सरकार उध्वस्त करत असताना,मी गप्प बसणार नाही, ते लोकांना समजावून सांगेन,आपण पण आपसात भांडत बसणे बरे नव्हे,संकटं ओळखून वेळीच एकत्रित या असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केलेे.
भारतीय बौध्द महासभा आणि लातूर अध्यक्षीय मंडळाच्यावतीने लातूरच्या आंबेडकर पार्कवर दि.२५ व २६ मार्च रोजी आयोजित तिसरी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेच्या समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून त्या  बोलत होत्या.अध्यक्षपदी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे हे होते.मंचावर बौध्द भिख्खू,श्रामणेर संघ,माजी मंत्री आ.संजय बनसोडे,प्रसिध्द गायिका ,कडूबाई खरात, अध्यक्षीय मंडळाचे प्रा.अनंत लांडगे,चंद्रकांत चिकटे,मोहन माने,रमेश कांबळे,कमलाकर उबाळे,कुमार सोनकांबळे,व्ही.के.आचार्य,ऍड.संभाजीराव बोडके,ऍड.बाबासाहेब गायकवाड,लक्ष्मण कांबळे, बसवंतअप्पा उबाळे, अशोकराव कंाबळे,बालाजी कांबळे,अरुण कांबळे,ओव्हळ,एस.टी.चांदेगावकर,विजय श्रंगारे, एस.टी.मस्के,ऍड.अतिष चिकटे, रमेश श्रंगारे,पंकज  काटे,मच्छिंद्र बलांडे,किशोर चके्र,अण्णा कांबळे, प्रशांत कांबळे,प्रा.प्रवीण कांबळे, आदी उपस्थित होते.
हे सत्याचे,विज्ञानाचे जग असताना आजही भारतीय महिला मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा,शुभ-अशुभ मानतात,तीन आकडा तर अशुभ मानतात पण तीन दगडाची चूल,तीन पानाचे बेल,त्रिकालाबाधित सत्य चालते,बौध्द धम्मातली प्रज्ञा-शिल-करुणा ही त्रिरत्नेे चालतात,.चार आर्य सत्ये, पंचशील,आर्य अष्टांगमार्ग,दहा पारमिता आणि बाबासाहेबांनी घालून दिलेल्या २२ वी प्रतिज्ञा म्हणतो.हे म्हणत असताना याचा प्रत्यक्ष जीवन आचरणात भाग येतो हे प्रत्येकाने मनाला विचारावे आणि आपण उपासक-उपासिक होण्यास पात्र आहोत की नाही,याचा स्वःत ठरवावे,प्रज्ञा आणि दान पारमिताला खुप महत्व आहे. ते जाणा.धम्म चळवळीसाठी जे जे योगदान देणे शक्य ते करा,भारतीय संविधान बदलण्यासाठी साधी,विशेष दुुरुस्ती ,२७२ खासदारांचे समर्थन असे गरजेेचे आहे,ते भाजपाकडे आता,देशातील अर्धापेक्षा अधिक विधानसभांचे त्यांना समर्थन मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, याची माहिती देवून,अशा वेळी आपण मतदानाच्या माध्यमातून त्यांना संघटितपणे रोखणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
माजी मंत्री आ.संजय बनसोडे तथागताच्या सम्यक दृष्टी,विचारामुळे सबंध जग बुध्द धम्माकडे वळत आहे.देशातील इतर समाजही बुध्दाकडे येतोय,त्यासाठी बौध्दानीही संघटीतपणे पुढे यावे,बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या ताकदीने लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी पुढे यावे,ते सर्वांची जबाबदारी आहे,असे सांगून ज्या देशानी बुध्दाच्या विचारांची कास धरली ते प्रगतीपथावर गेल्याचे सांगितले.
बौध्दांनी आणि धम्मात येणार्‍यांनी बेटी व्यवहार केल्यास खर्‍या अर्थाने बाबासाहेबांचे भारत बौध्दमय करण्याचे स्वप्न साकार होण्यास साह्यभूत ठरेल,हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशातील तमाम महिलांसाठी कार्य केले.कवी वामनदादा कर्डकांच्या भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,वाणीत भीम असता,करणीत भीम असता..या गाण्यांचा संदर्भ देत चांगल्या कार्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग तरुण पिढीने,महिलांनी करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात अनिल बनसोडे यांनी केले.
या सत्राचे प्रास्ताविक बसवंतअप्पा उबाळे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.लहु वाघमारे व रंजना गायकवाड यांनी केले. अशेाकराव कांबळे यांनी आभार मानले.
सदरील धम्म परिषदेसाठी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बापूर गायकवाड, हिराचंद गायकवाड,विलास आल्टे, हणमंत कांबळे,बौध्दाचार्य देवदत्त बनसोडे, बौध्दाचार्य अशोक शिंदे, दत्तात्रय भोसले,दैवशाला गायकवाड, कविता कांबळे, करुणा कांबळे, शारदा हजारे, अर्जून कांबळे, ज्ञानेश्‍वर इंगळे, बिभीषण माने, अंगद भालेराव, संजय गायकवाड, प्रेमनाथ कांबळे,दिपक कांबळे,  धर्मराज गायकवाड, मायाताई कांबळे, आशाबाई चिकटे, रेखाताई घोबाळे, वंदना कांबळे,समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाराम साबळे, विकास दंतराव,राजाभाऊ उबाळे, अभिमन्यू लामतूरे,  देवराव जोगदंडे, नानासाहेब आवाड, पे्रेमनाथ कांबळे, दिपक कांबळे,रवी कांबळे, राम कांबळे, भीमराव करवंजे,तसेच अमर चिकटे, नितीन चिकटे, निखिल कांबळे, करण गायकवाड, नितीन कदम, अतुल कदम, कपिल गायकवाड,राहुल बनसोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी हजारोंच्या संख्येने धम्म भगिणी,बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed