• Tue. Apr 29th, 2025

निलंगा व औराद बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

Byjantaadmin

Mar 27, 2023

 

निलंगा व औराद बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
निलंगा:-आज निलंगा व औराद शहाजानी या बाजार समित्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर फार्मसी कॉलेज सभागृह निलंगा येथे काँग्रेस पक्षाची बैठक प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत व विजय विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीत कोणत्याही परिस्थीतीत या दोन्ही बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला . यावेळी तालुक्यातील जवळपास सर्वच विविध कार्यकारी सेवा सोयायटीचे चेअरमन व संचालक उपस्थित होते . या बैठकीत सर्वप्रथम अशोकराव पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावरील कार्यवाहीचा निषेध करणारा ठराव मांडला त्यास अभय साळुंके यांनी अनुमोदन दिले . यानंतर अभय साळुंके यांनी निलंगा बाजार समितीचे दिवंगत उपसभापती जलीलमियाँ देशमुख तसेच अनसवाडा पाटीजवळ अपघातात मरण पावलेले सावळे कुटुंबीय तसेच उत्कापाटीजवळ अपघातात मयत झालेले निलंगा येथील बडूरकर कुटुंबीय यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली . .यावेळी दोन्ही बाजार समितीतील निवडणूकीत पॅनलचे नाव डॉ . शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकार विकास पॅनल असे ठेवण्याचे ठरले .या दोन्ही बाजार समितीची निवडणूक माजी पालकमंत्री जिल्ह्याचे नेते मा. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष श्रीशेल उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणूकीत उमेदवार निवडीचे सर्वअधिकार अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके व विजयकुमार पाटील यांना देण्यात यावे असा ठराव जेष्ठ नेते मोहनराव भंडारे यांनी मांडला सर्वांनी हात उंचावून एकमताने हा ठराव मंजूर केला . यावेळी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांना सामावून घेणेबाबतचे सर्वाधिकार तालुकाध्यक्ष विजकुमार पाटील यांना देण्यात आले .याबैठकीत नव्यानेच कार्याध्यक्षपदी नेमणूक झालेले ॲड. नारायणराव सोमवंशी यांचा अशोकराव पाटील व अभय साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी बैठकीस तालुका कार्याध्यक्ष अॅड . नारायणराव सोमवंशी , जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रा राजेंद्र सूर्यवंशी माजी सभापती अजित माने , जेष्ठ नेते मोहनराव भंडारे , पंकज शेळके , सुरेंद्र धुमाळ , बालाजी पाटील , बालाजी गोमसाळे , लाला पटेल , महेश देशमुख , गंगाधर चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार यांच्यासह तालुक्यातील जवळपास सर्वच चेरमन , व्हा. चेरमन , संचालक पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed