परळी, 26 मार्च : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतं. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला होता. तुम्ही जर मला 2019 ला निवडून दिलं असतं तर वेगळं चित्र असतं असं पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
2009 ला जर मला निवडणूक लढऊ दिली असती तर आज परळी मतदारसंघ 15 वर्ष पुढे गेला असता. बारामती, इस्लामपूरपेक्षाही जास्त विकास मतदारसंघाचा झाला असता. दहा वर्ष तुम्ही सत्तेत होता मंत्री झालात मग या भागाचा विकास का केला नाही? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
‘हजारो कोटींचा प्रकल्प गेला’
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं. राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग तुम्ही सिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवाच असं आव्हान धनंज मुंडे यांनी पंकजा मुंडेंना दिलं आहे. वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शेरमेची बाब असल्याचं म्हणत धंजन मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना जोरदार टोला लगावला आहे
सरकारला टोला
दरम्यान राहुल गांधी यांच्या खासदारकीवरून धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. देशात लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.