• Wed. Apr 30th, 2025

मुलायम सिंह यादव यांचे निधन

Byjantaadmin

Oct 10, 2022

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. 82 वर्षीय मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनमुळे 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेदांता हॉस्पीटलच्या यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, मुलायम सिंह यांना किडनीच्या संसर्गासोबत रक्तदाबाचा त्रास वाढला होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर हलवले होते. 22 नोव्हेंबर 1939 रोजी सैफई येथे जन्म झालेले मुलायमसिंह यादव यांचे शिक्षण इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथे झाले. मुलायम काही दिवस मैनपुरीतील करहल येथील जैन इंटर कॉलेजमध्येही प्राध्यापक होते. पाच भावंडांपैकी दुसरे असलेले मुलायम सिंह यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे 2003 मध्ये निधन झाले. अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनावर राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

22 नोव्हेंबर 1939 रोजी सैफई येथे जन्म झालेले मुलायमसिंह यादव यांचे शिक्षण इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथे झाले. मुलायम काही दिवस मैनपुरीतील करहल येथील जैन इंटर कॉलेजमध्येही प्राध्यापक होते. पाच भावंडांपैकी दुसरे असलेले मुलायम सिंह यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे 2003 मध्ये निधन झाले. अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनावर राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री आणि सात वेळा खासदार
तरुणपणी कुस्तीची आवड असलेल्या मुलायम सिंह यांनी 55 वर्षे राजकारण केले. मुलायम सिंह 1967 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी जसवंतनगरमधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 5 डिसेंबर 1989 रोजी मुलायम प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते आणखी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. केंद्रातील देवेगौडा आणि गुजराल सरकारमध्ये संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. नेताजी या नावाने प्रसिद्ध असलेले मुलायम सिंह सात वेळा लोकसभेचे खासदार आणि नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले.

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये नेताजी नेहमीच अजिंक्य होते
मोदी त्सुनामीतही मुलायम मैनपुरीत कट्टर असल्याचे सिद्ध झाले. सपई किल्ला कोणीही हलवू शकला नाही. 2014 मध्ये मोदी लाटेतही मुलायम सिंह यांचा पराभव झाला नव्हता. राजकारणाच्या कुस्तीत यापूर्वी चार वेळा बाजी मारलेल्या मुलायम यांनी पाचव्यांदाही बाजी मारली. यासह मैनपुरीमध्ये सपाचा हा सलग नववा लोकसभा विजय ठरला.

मुलायम सिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. मुलायम सिंह यादव हे अध्यक्ष, जनेश्वर मिश्रा उपाध्यक्ष, कपिल देवसिंग आणि मोहम्मद आझम खान यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले गेले. तर मोहन सिंग यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आले होते. या घोषणेच्या एका महिन्यानंतर, म्हणजे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी त्यांनी बेगम हजरत महल पार्क या ठिकाणी पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले. यानंतर नेताजींच्या पक्षाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *