राज्यातील शेतकरी अडचणीत असतना सरकार जागचे हालत नाही. वारंवार मागणी करूनही पंचनामे होत नाहीत. अजय आशरसारख्या व्यक्तीला तिजोरीवर बसविले जाते. प्रशासकीय व्यवस्था संपविण्याचा घाट भाजपने घातला आहे. जी २० च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होतेय. जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार कामात नाही तर राज्याची तिजोरी लुटण्यातच वेगवान आहे, असा घणाघात केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत nana ptole बोलत होते. पटोले म्हणाले, “जी २०च्या नवाखाली पुणे, मुंबई, नागपूर शहरात झगमगाट करण्याचे काम सुरू आहे. त्याचे कोणत्याही प्रकारचे ऑडीट होणार नाही. त्यासाठी वीजचोरी केली जात आहे. त्या विजेचा बोजा संबंधित शहरातील नागरिकांवर टाकला जात आहे. मग हे सरकार चोर आहे का? एकीकडे झगमगाटासाठी शेकडो कोटींचा खर्च केला जातो. शेतकऱ्यांना मात्र दिवसा वीज देता येत नाही. त्यांना नुकसानभरपाईसाठी पैसे नाहीत. कर्मचारी भरतीला पैसे नाहीत. मग हे सरकार लटारु आहे का? यातून हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे स्पष्ट होते.”
यावेळी पटोले यांनी या सरकारने प्रशासकीय व्यवस्था संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप केला. पटोले म्हणाले, “सध्या राज्यात ‘आऊटसोर्सिंग’च्या माध्यमातून सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रशासकिय व्यवस्था संपुष्टात आणण्याची सुरवात आहे. दरम्यान, ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना आंदोलन करून जुन्या अभ्यासक्रमासाठी भांडावे लागले. या अभ्यासू विद्यार्थ्यांवर ‘आऊटसोर्सिंग’मुळे बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या तोंडचा घासही हिराविला.”
दोन ‘ए’ चा भाजपचा संबंध काय?
दहा महिन्यातच सरकारने राज्याची तिजोरी खाली वेगाने खाली केली. ते सोयीचे उत्तरे देतात. अजय आशरबाबत त्यांनी उत्तर दिले पाहिजे. दिल्लीत आदाणी आणि राज्यात अजय आशर. या दोघांच्या माध्यमातून देशाला व राज्याला लुटण्याचे काम भाजप करीत आहे. या दोन ‘ए’चा भाजपशी काय संबंध आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे. मात्र सध्या प्रश्न विचारले तर सत्तेतील हुकुमशाही व्यवस्था मुस्कटदाबी करते.