• Wed. Apr 30th, 2025

ललित मोदी, नीरव मोदी ओबीसी नेते, सन्मानाने परत आणा, त्यांना नेते मानू, वडेट्टीवारांचा टोला

Byjantaadmin

Mar 26, 2023

नागपूर : ललित मोदी आणि नीरव मोदी हे देशातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत. ते पळून गेल्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला खूप वाईट वाटले आहे. त्यांना सन्मानाने परत आणून त्यांची पूजा करावी. आम्ही त्यांना आमचा नेता मानणार, चोर म्हणणार नाही. यासह त्यांनी कितीही वेळा देशाची लूट केली तरी त्यांना काही म्हणता येणार नाही, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल कर खरमरीत टीका केली आहे

सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर भाजप त्यांना ओबीसी विरोधी म्हणत आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांनी राहुल गांधींविरोधात देशभरात निदर्शने केली. यावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘नीरव आणि ललित यांचे भाषण भाजपला विजय मिळवून देईन’

‘नीरव आणि ललित पळून गेल्याने भाजप नेते आणि ओबीसी नेते अतिशय दु:खी झाले आहेत. भाजपने त्यांना सन्मानाने परत आणावे. आम्ही त्यांचे स्वागत रेड कार्पेटवर करू. या देशाला दोघांच्या भाषणांची गरज आहे. तरच भाजप पुढची निवडणूक जिंकू शकेल. ते दोन्ही नेते भाजपला इतके प्रिय झाले आहेत की, जिथे एक चित्र दिसेल तिथे दोघांचेही चित्र असावे आणि दोघांची पूजा व्हावी’, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.

‘लोकशाहीची हत्या होतेय’

‘राजकारण आता कुठे चालले आहे. चोराला चोर म्हणू नका. दरोडेखोराला दरोडेखोर म्हणू नका. जर असं म्हटलं तर संपूर्ण समाजाचा अपमान होईल. त्यांना आता सर म्हणायची परिस्थिती आली आहे. राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करून देशातील लोकशाहीची हत्या करून राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

संविधान न पाळणे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कायदा न पाळणे हे केवळ विरोधकांचेच आहे. आपल्या हातात सत्ता आहे. आपण कितीही पापे केली तरी त्यावर काहीच नाही आणि विरोधक प्रश्न उपस्थित करत असतील तर दडपून टाका. महागाईने गरीब मरत आहेत. बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. पण विरोधकांनी प्रश्न केला तर दडपून टाका आणि सदस्यत्व रद्द करा, असा नवा ट्रेंड देशात सुरू झाल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

 

‘देश भाजपला माफ करणार नाही’

गांधी घराण्याच्या लोकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. ब्रिटिश राजवटीत ज्यांनी इंग्रजांची जी हुजुरी केली ते देशभक्त कसे असू शकतात? काँग्रेस सोमवारपासून देशव्यापी आंदोलन करणार आहे. राहुल गांधींना लोकसभेत येण्यापासून सरकार रोखू शकत नाही. लोकांची मने रोखू नका, जनता भाजपला कधीच माफ करणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed