मुंबई महानगरपालीके प्रमाणेच राज्यातील २७ महानगरपालीकांच्या उदयानामध्ये सोयीसुवीधा उभाराव्यात
आमदार अमित देशमुख यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद
या संदर्भातील अराखडा तयार करून तातडीने अमंलबजावणीचे निर्देश
लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि. २३ मार्च २०२३
मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर २७ महानगरपालीका क्षेत्रातील बागबगीचे वउदयानाच्या ठिकाणी शासनाच्या वतीने स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयीसुवीधा उभारण्यात यावीत, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान २१ मार्च रोजी विधानसभेत केली. राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, यासंबंधीचा व्यापक अराखडा तयार करून
त्याची तातडीने अमंलबजावणी केली जाईल अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुंबई महानगरपालीका क्षेत्रातील बागबगीचे व उदयानात पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यस्था, विदयुत दिवे तसेच सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था उभारणीबाबत आलेल्या लक्षवेधीवर बोलतांना मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या संदर्भाने विकास आराखडा तयार करण्याचे महापालिकाआयुक्तांना निर्देश दिले आहेत असे सभागृहात सांगितले.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेचे स्वागत करून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी हा विकास अराखडा फक्त मुंबई महानगरपालीकेच्या मर्यादेत न ठेवता राज्यातील इतर २७ महानगरपालीका क्षेत्रातील बागबगीचे व उदयानाचा त्यात समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मुंबई
महापालीका क्षेत्रातील बागबगीचे व उदयानात ज्या पध्दतीने वाढीव स्व्च्छतागृहे, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, विदयुत दिवे व इतर सोयीसुवीधा उभारण्या संदर्भात अराखडा तयार करण्या संदर्भात जे निर्देश दिले आहेत. त्याच पध्दतीने राज्यातील इतर २७ महानगरपालीका क्षेत्रातील उदयानात सुविधा उभारण्याचा त्या अराखडयात समावेश करण्याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाला निर्देश दयावेत अशी मागणी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली असता मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद
देत हा अराखडा राज्यातील सर्वच महानगरपालीकेच्या संदर्भाने तयार करण्यात येईल आणि त्यावर लगेच अमंलबजावणी करण्यात येईल अशी घोषणा केली.
मुख्यमंत्रयाच्या या घोषणेमूळे मुंबई प्रमाणे पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि लातूरसह इतर सर्वच महानगरपालीका क्षेत्रातील बागबगीचे व उदयाने येथे सर्व प्रकारच्या सोयीसुवीधा आता शासनाच्या वतीने उभारले जाणार आहेत.
अमित विलासराव देशमुख यांचे विधानसभा सभागृहात अभिष्टचिंतन महाराष्ट्र विधासभा अर्थसंकल्पीय अधिवेशयादरम्यान सभागृहात प्रश्नोत्तर कालावधीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस असल्याचे
सभागृहात सांगितले, यानंतर सभागृहात अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी वाढदिवसानिमित्त सभागृहाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.