• Thu. Aug 14th, 2025

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेसकडून विविध उपक्रमांनी साजरा

Byjantaadmin

Mar 21, 2023

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेसकडून विविध उपक्रमांनी साजरा

लातूर (प्रतिनिधी): (मंगळवार दि. २१ मार्च २०२३) राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ॲड. किरण जाधव यांच्या पुढाकारातून लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थान येथे श्री चा अभिषेक करण्यात आला. ग्रामदैवत हजरत सुरत शाहवली दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली तसेच श्री साईबाबा मंदिर येथे आरती करून वाढदिवसानिमित्ताने आमदार अमित विलासराव देशमुख यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अखंड जनसेवा घडो अशी प्रार्थना करण्यात आली.यानंतर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ॲड. किरण जाधव यांच्या पुढाकारातून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महानगरपालीका व जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव,  विजयकुमार साबदे,गोरोबा लोखंडे,चंद्रकांत धायगुडे,कैलास कांबळे,दगडुअप्पा मिटकरी,ॲड.देविदास बोरूळे पाटील,प्रवीण सूर्यवंशी,रमेश सूर्यवंशी,ॲड.फारूक शेख,सचिन मस्के,जालिंदर बरडे,प्रा.प्रवीण कांबळे,महेश काळे,गणेश देशमुख,आसिफ बागवान,तबरेज तांबोळी,सुनीत खंडागळे,सुलेखाताई कारेपुरकर,गिरीश ब्याळे,धनंजय शेळके,सुंदर पाटील कव्हेकर,ॲड.अंगदराव गायकवाड,शेख कलीम,प्रा.एम.पी.देशमुख,इसरार पठाण,नेताजी बादाडे,ॲड.किशनराव शिंदे,भाऊसाहेब भडिकर,संजय सूर्यवंशी,अकबर माडजे,अभिषेक पतंगे,अभिजित इगे,बालाजी झिपरे,विष्णुदास धायगुडे,यशपाल कांबळे,राहुल दुमणे,पवन सोलंकर,अक्षय मुरळे,ॲड.दिनेश रायकोडे,अविनाश बट्टेवार,राजू गवळी,करीम तांबोळी,आकाश मगर,खाजापाशा शेख,अमोल गायकवाड,अमन सय्यद,जयदेव मोहिते,रोहित वडरुळे,प्रमोद जोशी,प्रवीण सावंत,आबु मणियार,जय ढगे,खाजामियाँ शेख,पवन गायकवाड,मैनुद्दीन शेख,युसूफ बाटलीवला,अहेमद बागवान,अशोक कांबळे,गोविंद ठाकूर,जाफर शेख,अस्लम शेख,जफर पटवेकर आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *