जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी केदारप्पा रासूरे यांची निवड महिला अध्यक्षपदी डाॅ. विद्याताई जामकर
लातूर : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जन्मोत्सव समिती २०२३ च्या लातूर शहर अध्यक्षपदी केदारप्पा रासूरे यांची तर महिला विभागाच्या अध्यक्षपदी डाॅ. विद्याताई जामकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जन्मोत्सव समिती २०२३ च्या आयोजनासंदर्भात रविवारी सकाळी पाचशे घर मठ, आझाद चौक लातूर याठिकाणी लिंगायत समाज बांधवांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस लिंगायत समाजातील ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पोपडे, वाले , पोपडे ,राजकुमार खोबरे, महिला प्रमुख माजी महापौर स्मिताताई खानापूरे, लताताई मुद्दे, बामणकरताई यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी केदारप्पा रासूरे व डाॅ. विद्याताई जामकर यांची सर्वानुमते निवड करण्यातआली. सदरील बैठकीचे सूत्रसंचालन, मागील वर्षीचा आढावा व सर्व ठराव राजकुमार नाईकवाडे यांनी मांडले. यावेळी मावळते अध्यक्ष मनोज पाटील रायवाडीकर यांच्या तर्फे त्यांचे बंधू बालाजी पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे नूतन अध्यक्ष नावाचे प्रथम सूचक झाले व महिलांकडून माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई कौळखेरे यांनी मनोगत व्यक्त करून नवीन अध्यक्षा म्हणून त्यांनी डॉ. जामकर यांचे नाव सुचवले. त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आयेऊन त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष केदारप्पा रासूरे यांनी यावर्षीचा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी या उत्सवाच्या अनुषंगाने भव्य सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात येणार असल्याचे त्यांची नमूद केले. महिला अध्यक्षा डॉ. जामकर यांनी आपले विचार व्यक्त करताना यावर्षीच्या जन्मोत्सव सोहळ्यात महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय राहील यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी बैठकीस उमेश येरटे, वाले , राजकुमार खोबरे, जगदीश येरटे, किरण खोबरे, मंगेश पटणे, संगमेश्वर रासूरे, सागर मांडे, बालाजी झिपरे, अभिजीत मुनाळे, जयप्रकाश गुट्टे, विश्वनाथ खोबरे,अॅड. नीलेश करमुडी, नितीन हसाळे , श्रीनिवास लांडगे, राहूल धानूरे, धीरज हलकुडे, जवळे आप्पा, ओंकार मेंगशेट्टी, नारायण साठे, कलशेट्टी, रवी बिराजदार, मेनकुदळे, लक्ष्मण मुकडे, प्रकाश कोरे आदी समाजबांधव उपस्थित होते . सर्वांनी यावर्षीचा जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जन्मोत्सव जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. या बैठकीचे सूत्रसंचालन इंजिनिअर राजकुमार नाईकवाडे यांनी केले.