डीएस एक्सक्ल्युसिव्ह एन एक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त
आयोजित पैठणी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
लातूर : लातूरच्या वस्त्र विश्वात अल्पावधीत आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या द्वारकादास श्यामकुमार अर्थात डीएस एक्सक्ल्युसिव्ह एनएक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लातुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ हर घर पैठणी.. घर घर पैठणी ‘ हे घोषवाक्य घेऊन
भव्य दिव्य पैठणी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या भव्य दिव्य पैठणी महोत्सवाचे उद्घाटन सौ. शुभीजीताई अभिनव गुप्ता – गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या अध्यक्षस्थानी नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षस्थानी सौ. सुमतीताई जगताप या होत्या. यावेळी सौ. सविताताई लक्ष्मणराव मोरे, लातूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. वैशालीताई दाताळ , आर.एन. मोटेगावकर स्कुलच्या अध्यक्षा सौ. मिनलताई शिवराज मोटेगावकर, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुजाताताई लोहिया, डॉ. ज्योतीताई सूळ, हिरा पॅलेसच्या संचालिका सौ. संगीताताई दासराव शिरुरे , ग्लोबल इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका सौ. संजीवनीताई रमेश बिरादार, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. लताताई मुद्दे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सौ. दुर्गा तुकाराम पाटील, सौ. मीना राजेंद्र पाटील, सौ. पवार, सौ. माने, रुपाली बोराडे पाटील, यांनी सन्मानपत्र, साडी, शाल, पुष्पहार देऊन केले. या पैठणी महोत्सवाचे औचित्य साधून पैठणी कशी तयार केली जाते याचे प्रात्यक्षिकही पैठणी कारागिरांकडून उपस्थितांना दाखविण्यात आले. तसेच विविध आकर्षक पैठणी परिधान केलेल्या युवतींनी फॅशन शोच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश्य नमूद केला. द्वारकादास श्यामकुमारने ग्राहकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करून ती कायम जोपासण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला ग्राहकांकडून देवासारखे प्रेम मिळाले. ग्राहकाच्या सेवेमुळेच आपण यशस्वी होऊ शकलो आहोत, म्हणून आपल्या उत्पन्नातील दहा टक्के वाटा आपण नेहमी सामाजिक कार्यावर खर्च करण्याचे काम करतो,असेही त्यांनी सांगितले. आपल्या सर्वच शोरूम मध्ये महिलांचा नेहमी आदर केला जातो हे सांगताना त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या शोरूममध्ये आलेल्या तब्बल ३२०० महिला भगिनींचा सत्कार केल्याचे सांगितले.आपल्या कंपनीच्या सात शोरूम पैकीसगळ्यात अधिक सेल लातूरच्या शोरुमचा असून याचे सगळे श्रेय लातूरच्या सुजाण ग्राहक भगिनी – ग्राहक वर्गाला असलयाचे त्यांनी अत्यंत विनम्रपणे नमूद केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित सौ. शुभीजीताई अभिनव गुप्ता – गोयल , डॉ. वैशालीताई दाताळ , सौ. मिनलताई शिवराज मोटेगावकर, डॉ. ज्योतीताई सूळ, सौ. सौ. सुमतीताई जगताप यांनीही आपले आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक करून याच्या सुंदर आयोजनाबद्दल द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. या उपक्रमास अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा राजमाने – चव्हाण यांनी केले.