अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर शेतकरी आपले आंदोलन मागे घेतील.
शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. मात्र आज शेतकरी आपले आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यावरुन सभागृहात आज गोंधळ निर्माण होऊ शकतो.
TODAYS
‘खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय’ असे म्हणत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरु केली आहे. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांचीही उपस्थिती आहे. शेतमालाला मिळणाऱ्या भावावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
आशा सेविकांना नियमित वेतन व कायम करण्याबाबत राज्य शासनाने धोरण आखावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावरील उत्तरात शासन तज्ञ समितीची नेमणूक करून याबाबत अहवाल तयार करून केंद्र शासनास पाठविणार असल्याची माहिती मंत्री आरोग्य तानाजी सावंत यांनी दिली.
31 मे पर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील – अब्दूल सत्तार
अवकाळी मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली अशी मागणी विरोधकांनी केली आहे.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांची तातडीने मदत करू असे आश्वासन दिले आहे.
विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले, सरकार संवेदनशील आहे का, मुख्यमंत्र्यांचे वाचाळ मंत्री कुचंबना करतात. अवकाळीमुळे पिकांची वाट लागली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे ते आत्महत्येच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे याला गांभीर्याने घ्या. कांद्याला तुटपुंजी मदत मिळाली आहे. वाचा सविस्तर
पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या घडवून आणल्याची कबुली विधानपरिषदेत देण्यात आली. याबाबत सरकारने लेखी उत्तर दिले आहे. 48 वर्षीय शशिकांत वारिसे हे कोकणातील नाणार रिफायनरीविरोधात सातत्याने बातम्या लिहित होते, म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली असा आरोप केला जात आहे. वाचा सविस्तर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दूधात भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेत केली आहे.
दूध घेतात त्यात एका कॅनला काय मिक्स करायचे हे ठरलेलेचे असते. घ्यायचे ढवळायचे आणि कच्चीबच्ची मुले ते पितात. अशांना खरेतर फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे काल दुधात भेसळ प्रकरणी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदेंसह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला. वाचा सविस्तर
तब्बल तीन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या भूषण देसाईंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश दिला गेला. त्यानंतर आमदार रमेश पाटील आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरात वरून येते. आमच्याकडे जो साफ होईल, असे वक्तव्य विधान परिषदेत करतात. हे निषेधार्ह आहे. अशा घोटाळेखोरांवर पांघरुण घालू नका. त्यांची चौकशी करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत घेरले. वाचा सविस्तर
सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती करण्याचा आदेश दिला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आदेशाला स्थगिती दिली होती. यावरुन न्यायालयाने संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांना नाही, असे निर्देश दिले होते. यावर अजित पवार यांनी ज्यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले त्या-त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, अशी आठवण करून दिली.