राज्याच्या सत्तासंघर्षावरील गत नऊ महिण्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दोन्ही गटाचा युक्तिवाद आज संपला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा असून हा निकाल घटनापीठाने राखून ठेवला आहे.
तत्पूर्वी आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता राज्याच्या राजकीय भवितव्य काय असेल याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत सत्तासंघर्षात राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच, कपिल सिब्बल यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.