• Thu. May 8th, 2025

औरादच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन निराधारांना मानधन देण्यास टाळाटाळ

Byjantaadmin

Mar 16, 2023

औरादच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन निराधारांना मानधन देण्यास टाळाटाळ

तहसीलदार व वरीष्ठांनी वेळीच लक्ष घालून उर्मुटपणे वागणाऱ्या शाखा व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची निराधारांची मागणी.

औराद शहाजानी:-येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती बँक ही जवळपास दहा दे पंधरा गावातील शेतकऱ्यांच्या व निराधारांचे मानधन वाटप करण्यात येणारी बँक म्हणुन ओळख आहे तसेच या बँकेच्या माध्यमातून बरेच वर्षांपासून चांगले व्यवहार झालेली व नावारुपाला आलेली बँक म्हणुन ओळख असलेली बँक आहे पण या बँकेत मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे खाते उघडणे , पासबुक देणे , मानधन वाटप करण्यासारखे कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकतर हायवे रस्त्यावरील मोरे कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर असून या बँकेमध्ये जाणे-येणे करणे म्हणजे रस्त्यावर असलेल्या रहदारीमुळे धोकादायक आहे आणी अश्यातच या बँकेमध्ये वशीलेबाजीमुळे होत असलेली कामे निराधारांचे मनस्ताप वाढवणारी होत आसल्यामुळे निराधारांची हेळसांड होत आहे.
तहसीलदार निलंगा यांनी मागच्या महीन्यात दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी निराधारांचे मानधन यादी व धनादेश देऊन एक महीना झाला तरी येथील शाखा व्यवस्थापक यांनी दलालांचे लाभार्थ्यांना मानधन दिले तर इतर लाभार्थ्यांना देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत या लाभार्थ्यांचा जवळपास २४२९२००/- (चोवीस लक्ष एकोणतीस हजार दोनशे ) रुपये ही रक्कम इंगायो योजनेतील लाभार्थ्यांना , तर ७६२००० ही रक्कम संगायो योजनेच्या लाभार्थ्यांना , ७४२००/- ( चौऱ्याहत्तर हजार दोनशे ) ही रक्कम इं.गा.रा.वि.व.अ. या योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेली आहे.
येथील बँकेत औराद शहाजानी , तगरखेडा , हालसी (तु.) , शेळगी , माळेगाव (क.) कलमुगळी , ताडमुगळी व हलगरा या आठ गावच्या निराधारांचे मानधन अशी एकुण संपुर्ण रक्कम ही ३२,६५,४००/- (बत्तीस लक्ष पासष्ठ हजार चारशे रुपये )रुपये ऐवढ्या रकमेचा धनादेश हा लातूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक शाखा औराद यांच्या नावाने दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेला आसतानाही या बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी त्यांच्या मर्जीतील दलालांच्या संबंधातील संगायो , इंगायो लाभार्थ्यांना अदा केली तर अन्य लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारूनही आलेले मानधन देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. उलट मार्चऐंडीग सुरु आहे तुम्ही कुठलेतरी पैसे आणुन बँकेत जमा करण्यासाठी सांगत आहेत त्यामुळे अश्या या शाखा व्यवस्थापक यांचेवर त्यांच्या वरीष्ठांनी वेळीच योग्य ती कार्यवाही करणे गरजेचं असल्याचे निराधार लाभार्थी यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *