शासनाच्या निर्णयाची होळी ; संघटनांचा आक्रमक पवित्रा:मेस्मा लादण्याची हिटलरशाही, कर्मचाऱ्यामध्ये नाराजी
लातूर,: राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी 4 सदस्यांची समिती 14 मार्च रोजी स्थापन करुन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करण्याचे शासनाचे धोरण दिसून येते. त्यामुळे आज राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीतील संघटनांनी या शासन निर्णयाची होळी करुन शासनाचा निषेध केला. शासनाने मध्यवर्ती व समन्वय समितीतील संघटनांना चर्चेसाठी बोलावून मागण्यांचा सकारात्मक विचार करून जुनी पेंशन लागू करावी ती मान्य होईपर्यंत संपामध्ये सहभागी राहणार असल्याचेही कर्मचारी यावेळी म्हणाले.
राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर,2005 रोजी किंवा त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यांची समितीची 19 जानेवारी,2019 रोजी केली होती. त्या समितीचा त्रुटीचा अहवाल अद्यापही शासनास सादर नाही. ही दिरंगाई लक्षात घेता 14 मार्च,2023 रोजीच्या 4 सदस्यांची समिती स्थापन करनु शासन निर्णय काढण्यात आला या निर्णयाची होळी करुन समन्वय समितीने निषेध केला.
जिल्ह्यातील शासकीय-निम शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व सर्व संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दुसरा दिवस गाजविला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन ’ म्हणत कर्मचाऱ्यांनी संपात आजही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडून संप चिरडण्यासाठी मेस्मा कायदा बहुमताविना लागू करण्याची हिटलरशाही करत कायदा पास करुन घेतला ही लोकशाही पध्दतीने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे.. तो कायदा कर्मचाऱ्याच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचे शासन ठरवत आहे. याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे समन्वय समितीचे निमंत्रक संजय कलशेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
या संपात लातूर शहरातील हजारोंच्या संख्येने शासकीय-निमशासकीय-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जुन्या पेंशन योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकाधिक संख्येने कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही समन्वय समितीचे निमंत्रक कलशेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना केले. आज संपामध्ये समन्वय समितीतील 42 संघटनांनीही पाठिंबा देत सक्रीय सहभाग घेतला आहे.
या संपात जिल्हा समन्वये समितीचे अध्यक्ष बी .बी. गायकवाड, निमंत्रक संजय कलशेट्टी, राजय सरकारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एस. तांदळे, माधव एन. पांचाळ,(अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना), महेश हिप्परगे (अध्यक्ष, तलाठी संघटना),अनंत सुर्यवंशी (लातूर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE-136), संतोष माने, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, तानाजी सोमवंशी (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना), राज्य उपाध्यक्ष अरविंद कुलगुर्ले, राज्य समन्वयक दीपक येवते, अशोक माळगे,(विभागीय अध्यक्ष, माहिती व संपर्ककर्मचारी संघटना गट क), गोविंद गंगणे (अध्यक्ष, आयटीआय निदेशक संघटना, लातूर), हनमंत नागिमे,(अध्यक्ष, वस्तु व सेवा कर संघटना), बालाजी फड,(अध्यक्ष, समाजकल्याण कर्मचारी संघटना, गट क ), एस.डी.महामुनी (अध्यक्ष, कृषी कार्यालयीन कर्म. संघटना), व्ही.एन. परभणकर, (अध्यक्ष, सांख्यिकी कार्यालयीन कर्मचारी संघटना), मदन धुमाळ,(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, लातूर), नितीन बनसोडे (अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा), संजीव लहाने,(उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, लातूर), धनंजय उजनकर,(प्र.कार्या. पंजाबराव देशमुख परिषद),मधुकर जोंधळे,(मराठवाडा शिक्षक संघ), सुदेश परदेशी (अध्यक्ष, पोलीस कार्यालयीन कर्म. संघटना), धनंजय चामे,(अध्यक्ष, वनविभाग कार्या. कर्म. संघटना), बालक राम शिंदे (कोषाध्यक्ष, सहकार विभाग, कर्मचारी संघटना),अशोक केनिकर (सचिव, धर्मादाय कार्यालय,कर्मचारी संघटना), मंगेश पाटील (अध्यक्ष, जलसंपदा कर्म. संघटना), राहुल तुंगे (अध्यक्ष, तंत्रनिकेतन कार्यालयीन कर्मचारी संघटना),दत्तात्रय सुर्यवंशी, (अध्यक्ष, कास्ट्राईव महसुल कर्मचारी संघटना, लातूर) मच्छिंद्र गुरमे,(जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना, लातूर), प्रकाश देशमुख,(जिल्हाध्यक्ष, लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ), प्रथमेश वैद्य, (जिल्हा संघटक, राज्य कर्मचारी, मध्यवती संघटना., लातूर,,विठ्ठल बडे (जिल्हा सचिव, शिक्षक सहकार संघटना), उमेश सांगळे (सचिव, राष्ट्रीय परिवहन कार्या. संघटना), कृष्णा कोकणे,(अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम संघटना), संजय जाधव, (अध्यक्ष, भुमी अभिलेख का.कर्म. संघटना), जी.व्ही. माने,(जिल्हा सचिव, मराठवाडा शिक्षक संघ), जी.जी. रातोळे (केंद्रिय संचालक, मराठवाडा शिक्षक संघ), मोहाळकर जी.एस.(विभागीय महिला संघटक),आर.डी. जटाळ(लेखा परिक्षण कार्या.कर्मचारी संघटना) रेणुका गिरी, (अध्यक्ष, जि.प. नर्सेस संघटना, लातूर), सय्यद वाजीद (अध्यक्ष, जिल्हा कोषागार कर्मचारी संघटना, लातूर),अमोल चामे,(अध्यक्ष, लातूर जिल्हा शिक्षकेत्तरसंघटना, लातूर), गंगाधर एनाडले (सचिव, जि.प. कर्मचारी महासंघ, लातूर), चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाई श्रृंगारे, बंडाप्पा बिडवे आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.