• Wed. May 7th, 2025

‘युवासंवाद – भारत 2047’ कार्यक्रम आयोजनासाठी 29 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Byjantaadmin

Mar 15, 2023

‘युवासंवाद – भारत 2047’ कार्यक्रम आयोजनासाठी 29 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर,  (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळानिमित्ताने ‘भारत 2047’ अंतर्गत विविध कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्रांमार्फत 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत देशभरात प्रत्येक जिल्हास्तरावर समुदाय आधारित संस्थेच्या (सी.बी.ओ) सहकार्याने ‘युवा संवाद- भारत 2047’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तीन संस्थांची निवड करण्यात येणार असून इच्छुक संस्थांनी 29 मार्च 2023 पर्यंत नेहरू युवा केंद्राकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.‘युवा संवाद- भारत 2047’ कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती पंचप्राण या विषयावर चर्चा करतील, त्यानंतर किमान 500 युवकांच्या समुदायासोबत प्रश्नोत्तर व चर्चासत्र होईल. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्या समुदाय आधारित संस्था अर्ज करू इच्छितात, त्या पूर्णतः गैरराजकीय, निःपक्षपाती व युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संघटनात्मक शक्तिशाली असाव्यात. तसेच कुठल्याही प्रकारच्या अपराधिक प्रकरणात अडकलेल्या नसाव्यात. इच्छुक संस्थांनी आपले रीतसर प्रस्ताव 29 मार्च 2023 पर्यंत नेहरू युवा केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, लातूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *