सुषमा स्वराज पुरस्काराने डाँ प्रिया पुरी सन्मानीत
लातुर:- सामाजिक शैक्षणिक राजकीय वैद्यकीय कृषी उद्योग व्यवसाय प्रशासन यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांच्या हस्ते सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.डाँ प्रिया पुरी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील आज पर्यत केलेल्या भरीव कार्याबदल त्यांना सुषमा स्वराज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे जिल्हा उपाध्यक्ष ललिता कांबळे सुरेखा पुरी जिल्हा संयोजिका संगीता पाटील भाजपा महिला आघाडीच्या रेणापूर तालुकाध्यक्ष अनुसया फड लातूर तालुकाध्यक्ष उषाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.डाँ प्रिया पुरी यांना मिळालेल्या या पुरस्कारा बदल यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे,
सुषमा स्वराज पुरस्काराने डॉ. प्रिया पुरी सन्मानीत
