• Wed. Apr 30th, 2025

भारतीय वायुसेना स्थापना दिन

Byjantaadmin

Oct 8, 2022

आज ८ ऑक्टोबर

भारतीय वायुसेना स्थापना दिन

इतिहास

८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एयर फोर्स झाले.

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

*ध्येयवाक्य*

भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे :

नभ:स्पृशं दीप्तम्।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा –

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं

व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।

दृष्ट्वा ही त्वां प्रव्यथितान्तरात्मा

धृतिं न विन्दामि शमंच विष्णो॥

….भगवद्गीता ११.२४

—भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.

अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.

विमाने

इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली.

सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *