• Wed. Apr 30th, 2025

रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा

Byjantaadmin

Oct 7, 2022

रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा

बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-सर्व प्रवाशांची रेल्वे ही जीवनवाहीनी आहे.रेल्वे कर्मचा-यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने(बदलापूर-वांगणी-कर्जत-खोपोली)बुधवार दि.५आक्टोबर रोजी दसरा सणाचे औचित्य साधुन बदलापूर स्टेशनवर दसरा उत्सव साजरा करण्यात आला.दसरा सण हा हिंदू धर्मातील पवित्र सण आहे.दस-यानिमित्य रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक,रेल्वे सुरक्षा रक्षक,बुट पाॅलिशधारक,सफाई कर्मचारी यांचा स्वीट बाॅक्स व आपट्याच्या पानाच्या रुपाने सोने देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी श्री गणेश पूजन करून स्टेशन मास्तर केबिनला हार घालण्यात आला.शस्त्र पूजन करण्यात आले.याप्रसंगी स्टेशन प्रबंधक अरुप प्रितम,तसेच तुषार गायकवाड,एकनाथ मसणे,अशोक घोर,उदय निराळा यांचा सत्कार करण्यात आला.रेल्वे प्रवासी संघटनेबाबत सचिव अनिल बामणे यांनी माहीती विशद केली.याप्रसंगी सुवर्णा इस्वलकर,शिल्पा भूतकर,सचिन फळणे,विनोद पाटील,सचिन जाधव,उमेश पाटील,ऋषीकेश दरेकर,शैलेश इंगोले इत्यादी मान्यवर व रेल्वे प्रवासी उपस्थित होते.अल्पोपहाराने व एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *