• Mon. May 5th, 2025

शेतकरी हितासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी -माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सभागृहात केली मागणी

Byjantaadmin

Mar 13, 2023

शेतकरी हितासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी -माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सभागृहात केली मागणी

लातूर प्रतिनिधी : लातूर जिल्हयासह राज्यभरात यंदा हरभरा पिकाचे उत्तपादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेले हरभरा हमी भाव खरेदी केंद्र अपूरे पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडने हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी अधिवेशना दरम्यान सभागृहात केली आहे

यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले आहे. शेतकऱ्यांनी हरभरा पिक मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. राज्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झालेली असून लातूर जिल्हयात ही 3 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरण्यात आलेले आहे. सदया हरभरा काढणीचा हंगाम सुरु झालेला असुन अनेक शेतकरी हरभरा विक्रीसाठी बाजारात येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादन पिकास हमीभाव  मिळावा या उद्देशाने नाफेडच्यावतीने सरकारने खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्यासह लातूर जिल्हयातही हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले असले तरी त्याची संख्या भौगोलिक आणि शेतकऱ्यांच्या सोयी साठी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत असुन शेतकरऱ्यांची आर्थिक परवड होत आहे. त्यामुळेच लातूर जिल्हयासह राज्य भरातील शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केंद्र वाढविण्यात यावीत आणि त्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांचे हित आणि त्यांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठ केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपाय-योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन नाफेडने अनियमितता आढळून आलेली हरभरा खरेदी केंद्र वगळून रितसर अर्ज केलेल्या खरेदी केंद्रांना तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सभागृहात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *