• Mon. May 5th, 2025

ऑस्कर सोहळा, भारताला पहिल्यांदा 2 पुरस्कार

Byjantaadmin

Mar 13, 2023

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून सोमवारी सकाळीच एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय चित्रपट RRR मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. यापूर्वी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता. भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. कार्तिकी गोन्साल्विसने याचे दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोंगा ने प्रोड्यूस केला होता. पुरस्कार स्विकारताना गुनीत म्हणाली की- 2 महिलांनी भारतासाठी हे करून दाखवले. हा पुरस्कार माझ्या देशासाठी समर्पित आहे.

ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गुनीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘पिरियड एंड ऑफ सेंटन्स’ या चित्रपटाला 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटात बोमन आणि बेली या दक्षिण भारतीय जोडप्याची कथा आहे. जे रघु नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. मानव आणि प्राण्यांमधील नातं या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

The Elephant Whispers हा चित्रपट 8 डिसेंबर 2022 रोजी Netflix वर प्रसारित झाला. ही 39 मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे.
The Elephant Whispers हा चित्रपट 8 डिसेंबर 2022 रोजी Netflix वर प्रसारित झाला. ही 39 मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे.

62 वर्षात पहिल्यांदाच लाल ऐवजी शॅम्पेन रंगाचे कार्पेट
रेड कार्पेटचा ट्रेंड 62 वर्षांपूर्वी ऑस्करमध्ये सुरू झाला होता. यावेळी हा ट्रेंड बदलला आहे. यावेळी ऑस्कर सोहळ्यात स्टार्सनी शॅम्पेन कलरच्या कार्पेटवर एन्ट्री घेतली. याआधी काल-राहुलने RRR च्या नातू-नातू गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. उपस्थितांनी उभे राहून जल्लोष केला. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स पोहोचले होते.

नाटू-नाटूच्या गाण्यावर थिरकले हॉलिवूड

ऑल दॅट ब्रीद्स हा भारतीय डॉक्युमेंटरी चित्रपट शर्यतीतून बाहेर पडली. सर्वांच्या नजरा लागून असलेल्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला देखील सर्वोत्कृष्ट मुळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. तर यापूर्वी RRR च्या नाटू-नाटू या गाण्यावर राहुलने ​​​​​​ लाईव्ह परफॉर्मन्स केला होता. कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांनी उभे राहून जल्लोष केला

लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्स पोहोचले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये सजलेल्या या स्टार्सनी शॅम्पेन रंगीत कार्पेटवर एन्ट्री केली. यावेळी सोहळ्यात रेड कार्पेटला स्थान देण्यात आलेले नाही. दीपिका पदुकोण यावर्षी सादरकर्ता म्हणून या सोहळ्याचा एक भाग बनली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *