• Mon. May 5th, 2025

तो व्हिडीओ शिंदे गटानेच व्हायरल केला का? म्हात्रेंच्या व्हिडीओवर रुपाली पाटलांनी व्यक्त केली शंका

Byjantaadmin

Mar 12, 2023

Rupali Patil | Sheetal mhatre

”ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं ..महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरल तेच उगवलं आहे त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे…अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हांत्रेच्या कथित व्हायरल व्हिडिओ वर केली. पण आम्ही विरोधात असलो तरी त्यांच्या पाठीशी आहोत, असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर कारवाई केली नाही… त्यामुळे ही हिम्मत वाढली आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला अशी कृत्य करतील असे वाटत नाही…ही खात्री आहे. पण खूप वाईट वाटलं.

म्हात्रे आता विरोधकांवर आरोप करत असेल तरी तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय, त्या लोकांनीच तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही ना त्याचा तपास झाला पाहिजे.सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत आहोत. आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी.तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी ही मागणी आहे.

ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती अस करु शकत नाही. भाजप आणि शिंदे गट सातत्याने बदनामी करत आहे. आमचीही बदनामी करण्याचं काम भाजप आणि शिंदे गटाचं आहे. ठाकरे गटातील कुठलीही व्यक्ती असे करणार नाही, याची चौकशी करा. टीका करायची म्हणून बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला दुःख कळतं,पणं अशी वेळ इतर महिलांवर आली की गप्प बसतात, आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा, असंही रुपाली पाटलांनी म्हटलं आहे.

हे जर खरं असेल तर तश्या प्रकारचा विनय भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बदनमी केली हा गुन्हा ही दाखल होऊ शकतो. पण यात जर अंध भक्तच निघाले तर सत्ताधारी काय करणार त्याच ही सांगावं. नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्यांना फोडून काढतो, परत व्हिडिओ शूटिंग करायला हात पुढे राहणार नाही. पण मी खात्रीशीर सांगते जबाबदारीने सांगते सोशल मीडियावर हे व्हायरल होणे घातक आहे. गृह खात्याने जागं होऊन यावर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. फक्त शीतल म्हात्रे नव्हे तर प्रत्येक महिलांवर जो अन्याय होतो त्यांना न्याय मिळालं पाहिजे, अशी मागणीही रुपाली पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *