दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वाती मालिवाल यांनी वडिलांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
SWATI माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ”मी लहान होते तेव्हा वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. वडिल मला मारहाण करायचे. त्यामुळे मी घाबरायचे आणि पलंगाखाली लपून बसायचे. ते घरी आले की भीती वाटायची. तेव्हा मी रात्र-रात्र विचार करायचे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना धडा शिकवाचा”, असं त्या म्हणाल्या.
”मी लहान होते तेव्हा ते मला मारायचे. माझी वेणी ओढायचे. भिंतीवर डोकं आपटायचे. त्यामुळे मला दुखापत होऊन रक्तस्राव व्हायचा. मला खूपच वेदना व्हायच्या. अनेक जण असे आहेत, त्यांच्यासोबत देखील असंच घडलं असेल, त्यामुळे दुसऱ्यांच्या वेदना मी समजते. यामुळे अंतर्मन जागृत होतं आणि संपूर्ण व्यवस्था बदलून टाकते”, असं त्या यावेळी म्हणाल्या.दरम्यान, स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.DELHI महिला आयोगाचे अध्यक्षपद हे २०१५ पासून त्यांच्याकडेच आहे. मात्र, त्यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.