• Wed. Apr 30th, 2025

युनिकॉन मोटार्स प्रा. लि. लातूर यांच्या आयशरच्या अद्यावत शो रुमचे थाटात उद्घाटन

Byjantaadmin

Oct 7, 2022
युनिकॉन मोटार्स प्रा. लि. लातूर यांच्या
आयशरच्या अद्यावत शो रुमचे थाटात उद्घाटन
लातूर :    युनिकॉन मोटार्स प्रा. लि. लातूर यांच्या लातुरातील आयशर कंपनीच्या अद्यावत शो रुमचे उदघाटन शुक्रवारी थाटात पार पडले. अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अल्पावधीत जागतिक पातळीवर विविध प्रकारच्या वाहनांची उपलब्धी करून ग्राहकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आयशर कंपनीच्या या शो रुममुळे ग्राहकांची चांगली सोय झाली आहे.
लातूर शहरातील युवा उद्योजक रितेश रेड्डी यांनी युनिकॉन मोटार्स प्रा. लि. च्या माध्यमातून आयशर कंपनीच्या वाहनांची अधिकृत एजन्सी घेतली आहे. या उदघाटनप्रसंगी आयशर चे वरीष्ठ मार्केटिंग व्हा. प्रेसिडेंट रमेश राजगोपाल, जनरल मॅनेजर राजेश कुमारन, टी. बालासुब्रमण्यम, युवा नेते अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, संजय नागेश्वर, राजशेखर गणाचार्य, एड. भारत साबदे, अनिकेत आपटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अभिजीत देशमुख यांनी केले. आपल्या विस्तृत प्रास्ताविकात त्यांनी युवा उद्योजक रितेश रेडडी यांच्या रुपाने आयशर कंपनीला अपेक्षेपेक्षाही अधिक व्यवसायाचे उद्दीष्ट गाठून देणारे सहयोगी मिळाल्याचे सांगितले. हे युवा उद्योजक न सांगताही कंपनीचे उद्दीष्ट गाठणार असल्याने कंपनीने त्याबाबत अगदी निश्चिंत असावे, असा विश्वास व्यक्त केला.
राजेश कुमारन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना युनिकॉन मोटार्स च्या माध्यमातून आयशर च्या अद्यावत दालनाची सुरुवात झाली असून या दालनास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले. तर राजगोपालन यांनी आपले विचार व्यक्त करताना आयशर कंपनी ग्राहक व एजन्सी या दोघांनाही समजून घेऊन काम करते असे सांगितले. मागच्या चाळीस वर्षापासून आपली कंपनी ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. आयशरची सर्वच वाहने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्त्यावर उतरवली जातात. चांगल्या मायलेजमुळेही ग्राहक याकडे आकृष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जमीर पठाण, सिद्धेश्वर चिल्लरगे, संतोष कांबळे, सादीक सय्यद, गणेश गायकवाड, बब्रुवान तेलंग, विठ्ठल सूर्यवंशी, जमीर शेख, आलिम पिंजारे, धनराज माने, याकुब शेख, सोमेश वरियाणी, शिवशंकर चलवा या ग्राहकांना आयशर वाहनांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जून माकणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *