• Wed. Apr 30th, 2025

जागृती शुगर कडून दिवाळी निमित्ताने सभासदांना साखर वाटप सभासदांची दिवाळी होणार गोड

Byjantaadmin

Oct 7, 2022

जागृती शुगर कडून दिवाळीनिमित्ताने सभासदांना साखर वाटप सभासदांची दिवाळी होणार गोड

लातूर :-महाराष्ट्राच्या खाजगी साखर कारखानदारीत उत्तम झेप घेणाऱ्या व ऊस उत्पादकांसाठी आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखान्यांकडून दिवाळी सनानिमित्त जागृती शुगर चे सभासदांना १५ किलो साखर तीही १५ रुपयांच्या सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय माजी मंत्री जागृतीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख  तथा जागृतीच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख) यांनी घेतला असून यामुळे जागृती शुगर च्या सभासदांची दिवाळी गोड होणार आहे

मराठवाडा व विदर्भात अधिक उसाचे गाळप करून सर्वाधिक एफ आर पी पेक्षा अधिक भाव देण्याचा विक्रम याच जागृती साखर कारखान्याने केलेला आहे हे करीत असताना शेतकरी हा केंद्र बिंदू समोर ठेवून साखर कारखान्याने अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत या महिन्यात दीपावली सन असल्याने प्रत्येक सभासदांना १५ किलो साखर १५ रूपये प्रमाणे सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला असून साखर वाटप दिनांक १० ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत आपल्या नजीकच्या शेतकरी गट कार्यालयात घेवून जावे त्यासाठी आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र सोबत ठेवावे वेळेच्या मुदतीत साखर घेवुन जाण्याचे आवाहन जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed