ग्राहक संरक्षण परिषदेवर मंजुश्री ढेपे पाटील
लातूर/प्रतिनिधी:अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हा संघटक मंजुश्री ढेपे पाटील यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय पंचायतच्या शिफारशीवरून ही नियुक्ती कारण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.या निवडी बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ॲड.महेश ढवळे,दत्ता मिरकिले,प्रो.एन.जी.माळी,
शामसुंदर मानधना,ॲड.इस्माईल शेख,ॲड. संगमेश्वर रासुरे,रजिया शेख,वैशाली शिंदे आदींनी ढेपे पाटील यांचे अभिनंदन केले.