LATUR झाडांना चुना-गेरू रंग लावून रंगपंचमी साजरी. ग्रीन लातूर वृक्ष टीमचा पर्यावरण पूरक उपक्रम. प्रत्येक सण-उत्सव, सुख, दुःखनिसर्गाच्या सोबत, निसर्गाच्या सानिध्यात साजरी करण्याची ग्रीन लातूर वृक्ष टीमची परंपरा आहे. दिवाळी-दसरा-गणेशोत्सव, व्हॅलेंटाईन डे, रमझान, ईद, देवदेवतांचे इतर सण, जयंती इत्यादी झाडे लावून, झाडांचे संगोपन करून साजरे केले जातात. “झाडांची होळी नको, झाडांसोबत होळी – रंग खेळू.” हा संदेश देत ग्रीन लातूर वृक्ष टीमने अत्यंत आकर्षक पध्द्तीने नंदी स्टॉप ते आदर्श कॉलनी दुभाजकातील १५६ झाडांना चुना-गेरू-कीटकनाशके द्रव्य युक्त रंग लावून निसर्गाचे-झाडांचे संवर्धन कार्य करून रंगपंचमी साजरी केली.यामुळे झाडांना किड लागणे, वाळवी लागणे असे प्रकार कमी होतात. निसर्गाचे संवर्धन करा, निसर्ग जपा, असा संदेश देत लातूरकराना रंगोत्सवाच्या रंगीत शुभेच्छा देण्यात आल्या