म. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या
स्थापनेबद्दल लिंगायत समाजातर्फे शासनाचे अभिनंदन
लातूर : राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागच्या अनेक वर्षांपासूनची लिंगायत समाजाची मागणी असलेल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला.
लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या परिसरातील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामंडळ स्थापनेच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले. या महामंडळाच्या स्थापनेने लिंगायत समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. यावेळी लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर, प्रा.राजेश विभुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य शासनाचे विशेष अभिनंदन केले. लिंगायत धर्मियांची मागच्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनय कोरे यांच्यासमवेत लिंगायत समन्वय समितीची प्रदीर्घ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत लिंगायतांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. त्यात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेचाही विषय होता. ही मागणी प्रत्यक्षात उतरली असून भविष्यात अन्य मागण्याही निश्चित पूर्ण होणार असल्याचे यावेळी माधवराव पाटील टाकळीकर व प्रा. विभुते यांनी सांगितले. यावेळी महेश पाटील, प्रा. डॉ. सिद्रामप्पा डोंगरगे, बसव ब्रिगेड लातूर जिल्हाध्यक्ष बसवेश्वर हेंगणे, राजकुमार कत्ते , सुनील हेंगणे, सुर्यकांत वाले , शिवलिंग जेवळे, रोहित चवळे, संगमेश्वर रासुरे, शिवशंकर शेटे, काशिनाथ बळवंते, गुरनाथप्पा उच्चेकर, श्रीनिवास मेनकुदळे, इरण्णा पावले, विरेश कोरे,रवि बिराजदार, श्रीधर स्वामी, प्रशांत पाटील, राहुल पाटील, संभाजी लातुरे, बसवेश्वरप्पा हालकुडे, राजकुमार खोबरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
म. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेबद्दल लिंगायत समाजातर्फे शासनाचे अभिनंदन
