जागतिक महिला दिन – सावित्रीबाई नसत्या तर आजची पिढी प्रगत नसती- सौ. दिपाली रा. पाटील
जि.प.प्रा शाळा बिंदगीहाळ ता. जि. लातूर, येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . या देखण्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान उच्च माध्यमिक विघालयाचे प्राचार्य श्री आर.आर पाटील व प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ. पूनम ताई कांबळे व उपसरपंच सौ आशाताई शिंदे उपस्थित होत्या . तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ कमळाबाई सावंत व गावातील पालक श्री दिगंबर शिंदे तसेच यावेळी बहुसंख्यमातापालक उपस्थित होत्या . यामध्ये सौ दिपालीताई पाटील, सौं सुप्रियाताई पाटील, सौ उषाताई पाटील, सौ मनिषाताई कदम ‘ सौ मनिषाताई शिंदे ‘ ‘ सौ पूजा विकास शेंडगे आदिकरून सर्व महिलांचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला . विशेष म्हणजे या समई सौ दिपाली रामप्रसाद शिंदे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले. बिंदगीहाळ नगरीच्या सरपंच व उपसरपंच पदी महिलांचीच निवड झाली असून त्यांनीही या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले . श्रीपाटील सरांनी अध्यक्षीय समारोप करताना सर्वांना मार्गदर्शन केले . श्री साळुंके सरांनी सुत्रसंचलन व आभार मानले . आशा पद्धतीने शाळेत महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.